नाटकाची शाळा

नाटकाची शाळा "रंगशीला" तर्फे नाटकाची शाळा हा बाल-कुमारांना वर्षभर नाट्य प्रशिक्षण देणारा उपक्रम आहे.

नाटकाची शाळा हा बाल-कुमार नाट्यचळवळीअंतर्गत वर्षभर नाट्य प्रशिक्षण देणारा उपक्रम आहे.

या उपक्रमांतर्गत बाल आणि कुमार वयोगटातील मुलांचे वय लक्षात घेऊन त्या आवश्यकतेनुसार त्यांना नाटकाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. या नाट्य प्रशिक्षणामध्ये अभिनयासोबत इतर तांत्रिक बाबींचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार आणि आपल्याला गती असलेल्या विभागासंदर्भात ज्ञान मिळवता येईल. तसेच इतर बाबी

ंबाबत गरजेपुरती परंतू अत्यावश्यक माहिती सहभागीला मिळते. ह्या नाटकाच्या शाळेत फक्त प्रशिक्षण नव्हे तर मिळालेल्या माहितीचा, ज्ञानाचा कार्यानुभव सुध्दा सहभागीला मिळते. प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यामुळे योग्य वयातच दृष्टीकोन तयार होतो, ज्याचा उपयोग भविष्यात केवळ नाट्यक्षेत्रातच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यात देखील होतो.

नाटक हा मुळात व्यक्त होण्याचा खेळ असल्यामुळे नाट्यप्रशिक्षणातून विचार करण्याची प्रक्रिया सुरु होते, कल्पनाशक्तीला जोर मिळतो, चांगल्या गोष्टी बघण्याची, वाचण्याची, ऐकण्याची आणि करण्याची सवय लागते, माणूस म्हणून जगण्याची प्रक्रिया आनंदात सुरु होते.

या संकल्पनेला सौ. भैरवी पुरंदरे ज्या गेली 12 वर्षे बालकुमार नाट्यचळवळीसाठी अथक काम करत आहेत,

संस्थेसाठी हा उपक्रम अतिशय महत्वाकांक्षी असून, ख-या अभ्यासकांच्या प्रतिसादाची संस्था वाट पहात आहे.

या नाट्यशाळेसाठी वयोगट खालीलप्रमाणे असतील
बालगट : वय वर्षे ७ ते वय वर्षे ११
कुमारगट : वय वर्षे ११ ते वय वर्षे १५

जागतिक महिला दिन साजरा करूया अनोख्या पद्धतीने.. महिलांनो, रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा *ब्रेक* घ्या आणि धमाल करा...
03/03/2026

जागतिक महिला दिन साजरा करूया अनोख्या पद्धतीने.. महिलांनो, रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा *ब्रेक* घ्या आणि धमाल करा.. स्वतः साठी.. पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी.. खास महिलांसाठी एक अभिनव नाट्य कार्यशाळा.. जिथे आहे खूप धमाल, activities, games, नाटक, हास्यविनोद, एकमेकींना जाणून घेणे, नव्या ओळखी..

आणि हो.. तुमच्यासाठी चहा कॉफ़ी snacks आणि जेवणाची पण सोय केली आहे. तुम्ही फक्त यायचं आणि आमच्यात सामील व्हायचं. एका नवीन विश्वात रमायचं.. इथे तुमच्यासाठी बक्षीसे पण ठेवली आहेत आणि बरंच काही आहे.. तुम्ही या तर 😍
वरील पोस्टर मध्ये सगळी माहिती दिलेली आहेच.. नक्की संपर्क करा. भेटूच 🎭👑

🎭नाटकाची शाळा आपल्यासाठी घेऊन येत आहे ही सुवर्णसंधी..... *आपल्या पाल्याच्या व्यक्तिमत्व विकासाची*🎭💃✍️🖼️*नाटकाची शाळा आयो...
13/04/2025

🎭नाटकाची शाळा आपल्यासाठी घेऊन येत आहे ही सुवर्णसंधी..... *आपल्या पाल्याच्या व्यक्तिमत्व विकासाची*🎭💃✍️🖼️

*नाटकाची शाळा आयोजित Summer Theatre Workshop म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव, कल्पनाशक्ती ला चालना, आणि व्यक्तिमत्व विकास*

*अभिनय, नृत्यकला, हस्तकला या तिन्ही कलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षक*

🗒️कधी - ५ मे ते १४ मे
१५ मे ते २४ मे

⏰वेळ - सकाळी ९ ते दुपारी १

💒ठिकाण = द डान्स फाउंडेशन
*6 कपिल संकल्प*
*पेरूगेट पोलीस चौकी शेजारी*
*सदाशिव पेठ*
*पुणे - 30*

🌈 *आमच्या कार्यशाळेतील काही ठळक मुद्दे आणि पालकांच्या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे*

1..मर्यादित विद्यार्थी संख्या

2..तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

3..अभिनय कौशल्यातील बारकाव्यांसहित नाटक शिकण्याची कला अनुभवणे

4..नृत्य शिकणे, अभिनयासाठी पूरक कला, तसेच स्वतः नाटकाचा back drop तयार करणे व त्यासाठी सुलेखन, चित्रकला, हस्तकला यासंबंधी थोडक्यात मार्गदर्शन आणि निर्मितीचा अनुभव.

5..कलेशी संबंधित काही ठिकाणांना भेटी देणे. उदा.. ऑडिओ स्टुडिओ ला भेट.

6..कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी मुलांचे पालकांसमोर सादरीकरण.

*चला,आजच संपर्क साधा आणि नावनोंदणी करा* ✍️

📱संपर्क - 9850678811/9209593685

Address

1228,Sadashiv Peth,
पुणे
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when नाटकाची शाळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share