Prachin Konkan Museum

Prachin Konkan Museum Open-air museum displaying socio-cultural life of indigenous Konkani people.

हापूस आंबा हा फळांचा राजा असून त्याचे नाव काढताच लहान मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्याचे कारण देखील तसेच आहे.प्राचीन...
11/12/2023

हापूस आंबा हा फळांचा राजा असून त्याचे नाव काढताच लहान मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्याचे कारण देखील तसेच आहे.
प्राचीन कोकण- हापूस आंबा खरेदी करण्याचे विश्वसनीय ठिकाण.

खैराच्या झाडाच्या अतिजून, लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळवून काढलेल्या पदार्थास कात (किंवा काथ) म्हणतात.खैराच्या बिया ...
08/12/2023

खैराच्या झाडाच्या अतिजून, लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळवून काढलेल्या पदार्थास कात (किंवा काथ) म्हणतात.

खैराच्या बिया प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. आयुर्वेदीय औषधांमध्ये मुखविकार, डायरिया यावर औषध म्हणून कात वापरतात. तसेच तोंडाला चव आणण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी व दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी काताचा वापर करतात. कात कफ कमी करून गळा साफ करतो. अतिसार, आमांश पोटात दुखणे इत्यादींसाठी काताची पूड अणि मध घेतात. अधिक वेळा लघवी होत असल्यास कातपूड वापरतात. काताचा उपयोग जखम लवकर भरून येण्यासाठी होतो. तसेच उपदंशच्या व्रणावरही कात उपयुक्त आहे. कात पाचक, रक्तशोधक आणि कफनाशक असून खदिरवटी, खदिरादी तेल या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात. खैराचे लाल खैर, सोनखैर असे इतर प्रकार आहेत. हिंदू मान्यतेनुसार खैर मृग नक्षत्राचा आराध्यवृक्ष मानला जातो.
या बद्दल अधिक वैशिष्ठ्यपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता जरुर या "प्राचीन कोकण".

शुद्ध मध खरेदी करण्याचे विश्वसनीय ठिकाण - "प्राचीन कोकण".
07/12/2023

शुद्ध मध खरेदी करण्याचे विश्वसनीय ठिकाण - "प्राचीन कोकण".

आजतागायत १७० च्या आसपास फुलपाखरांची प्रजातींची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात आहे.वनस्पती जीवनाची सुरुवात लाखो वर्षापूर्वी पृथ...
07/12/2023

आजतागायत १७० च्या आसपास फुलपाखरांची प्रजातींची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात आहे.

वनस्पती जीवनाची सुरुवात लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर झाली आणि बहुपेशीय असणारे पण अत्यंत कमी गुंतागुंतीचे असणारे जीवन हळू हळू परस्परावलंबी होण्याकडे वाटचाल करू लागले. या सर्व उत्क्रांती पर्वात अनेक सजीव एकमेकाच्या संपर्कात येऊन अन्नसाखळ्या तयार होत होत्याच तसेच सहजीवन सुद्धा बहरत होते, याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे वनस्पती आणि कीटक पांचे परस्परावलंबी सहजीवन, हिरव्या पानातील हरितद्रव्य कमी मात्रेत किंवा पूर्णपणे त्यागून रंगीबेरंगी पाने आणि शेवटी फुलाची निर्मिती ही सपुष्प वनस्पतींच्या वाढीचा महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे कारण यातून निर्माण झालेली पुष्पिय विविधता फक्त विविध रंगांची उधळण यावर न थांबता विविध आकारउकार, गंध, नकला, रसायने निर्मित अश्या अनेक आविष्काराना निसर्गात दाखल करून घेणारी ठरली आहे. या मागे महत्त्वाचे असणारे कारण म्हणजे वनस्पतींचे प्रजनन आणि त्यासाठी लागणारे परागीभवन, अनेक सपूष्प वनस्पती फक्त काही प्रकारच्या सजिवांवर परागीभवनसाठी पूर्णपणे अवलंबून असल्याचे आता वनस्पती शास्त्रज्ञांच्या लक्ष्यात येते आहे आणि या साखळीतला एखादा घटक जर कमीजास्त झाला तर त्यामुळे बिघडणारा पर्यावरणीय समतोल ही एक मोठी समस्या म्हणून दिवसेंदिवस पुढे येत आहे. या पाश्वभूमीवर कीटक वर्गातील महत्त्वाचा घटक म्हणजे फुलपाखरे आणि वनस्पती यांचे सहजीवन समजून घेणे हे सुद्धा तितकेच संयुक्तिक ठरते.
फुलपाखरांचा जीवनक्रम हा चार स्टेज असणारा, अंडी अळी कोष आणि प्रौढ, नर मादी चे मिलन झाले की मादी त्या त्या प्रजातीचे विशिष्ठ प्रकारची गुण वैशिष्ट्ये असणारे होस्ट प्लांट म्हणजेच खाद्य वनस्पती शोधून त्यावर अंडी देते. ही झाडे शोधण्यासाठी रंग आणि गंध ज्ञानाचा उपयोग फुलपाखरांना होत असावा असा अंदाज आहे. ठराविक जातींनी ठराविक फॅमिली मधली झाडे शोधून त्यांची पाने खाणे वर्षानुवर्ष चाललेल्या पद्धतीतून आत्मसात केले असावे. जसे की टेलड जे आणि कॉमन जे फुलपाखरांचे सुरवंट सीताफळ सोनचाफा खोटा अशोक या family Annonaceae मचील झाडांवर अंडी देतात आणि त्यांचे सुरवंट या झाडांची पाने खाऊन मोठे होतात. तर कॉमन मॉर्मन, लाईम स्वलो टेल ही फुलपाखरे family Rutaceae या लिंबू वर्गीय वनस्पती म्हणजे लिंबू, ईडलिंबु,कढ़ी पत्ता, बेल, पपनस अश्या वनस्पतींना आपले खाद्य बनवतात. अश्या प्रकारचे वनस्पती आणि फुलपाखरांचे विकसित झालेले परस्परावलंबीत्व हे खूपच वैशिष्टय पूर्ण असून फुलपाखरांना प्रौढ्वस्थेत लागणाऱ्या सर्व गुणधर्माची पूर्वी ह्या वनस्पती करत असतात. यात मुख्यतः समावेश होतो तो रंगवैविध्य
निर्माण करणारे घटक, भक्षकांपासून संरक्षण देणारे घटक, फुलपाखराचे शरीर विषारी बनवणारे घटक आणि प्रजननक्षम होण्यासाठी लागणारी आणि मिलन करते वेळी मादीला दिली जाणारी अमिनो आम्ले ई.

अधिक वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी जरूर या "प्राचीन कोकण".

प्राचीन कोकण संग्रहालयात आम्ही शंख प्रदर्शनासह छोटं मत्स्य प्रदर्शन देखील स्थापन केलय. या प्रदर्शनात काही दुर्मिळ आणि सु...
04/12/2023

प्राचीन कोकण संग्रहालयात आम्ही शंख प्रदर्शनासह छोटं मत्स्य प्रदर्शन देखील स्थापन केलय. या प्रदर्शनात काही दुर्मिळ आणि सुंदर माशांचे नमुने आहेत जसे की लायन फिश, सूरमयी, स्टार फिश, लॉबस्टर आणि बरेच काही. मासे कोकणी माणसाच्या आयुष्यातील नेहमीच एक महत्त्वपूर्ण घटक राहिले, त्यामुळे कोकणाची परंपरा व संस्कृती चे दर्शन आपणास घडवून देत असताना आम्ही एक छोटं मत्स्य प्रदर्शन देखील स्थापन केले आहे, तर हे प्रदर्शन बघायला जरूर या "प्राचीन कोकण".

#फिश

पराक्रमाचा इतिहास सांगणारी काही कोरीव शिल्पे आज वर्षानुवर्ष उन्हातान्हात उभी आहेत, ती म्हणजे कोकणात आढळणारे वीरगळ!वीरगती...
03/12/2023

पराक्रमाचा इतिहास सांगणारी काही कोरीव शिल्पे आज वर्षानुवर्ष उन्हातान्हात उभी आहेत, ती म्हणजे कोकणात आढळणारे वीरगळ!

वीरगती प्राप्त झालेल्या वीराचे स्मरण करण्यासाठी पाषाणावर काही विशिष्ट केलेले शिल्पांकन किंवा दगडावर केलेले कोरीव काम म्हणजे वीरगळ.

यापैकी सर्वात खालच्या भागात जेथे तो वीर धारातीर्थी पडला, तेथील युध्दप्रसंग कोरल्या जात असत. खालून दुसऱ्या चौकटीत बऱ्याच वेळा अप्सरा या धारातीर्थी पडलेल्या वीराला स्वर्गात नेत आहे असे दृश्य दाखवले जात असत. सगळ्यात वर असणाऱ्या पटात वीराच्या उपास्य देवेतेचे चित्रण केले जात असत.

काही वेळा या शिल्पाच्या वर चंद्र आणि सूर्य यांच्या आकृतीसुद्धा कोरलेल्या असून याचा अर्थ असा की या वीराचे स्मरण ‘यावच्चंद्र दिवाकरौ’ म्हणजे जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तोवर केले जावे.
असा हा पराक्रमाचा इतिहास सांगणारा 'वीरगळ' पहायला जरुर या "प्राचीन कोकण".

प्राचीन कोकण नेहमीच आपल्या बरोबर नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन येत असतो त्याच अंतर्गत कोकणातील सांस्कृतिक वैभवाचे दर्शन आपल्य...
02/12/2023

प्राचीन कोकण नेहमीच आपल्या बरोबर नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन येत असतो त्याच अंतर्गत कोकणातील सांस्कृतिक वैभवाचे दर्शन आपल्याला घडवत असताना आम्ही आपल्या साठी एक उपहारगृह देखील तयार करुन घेतलेले असून, तिथे आपल्याला कोकणातील पारंपारिक पदार्थांचा देखील आस्वाद घेता येईल. अस्सल कोकम खरेदी करण्यासाठी जरुर या "प्राचीन कोकण"...

#ड्रिंक

कोकण हे निसर्गसौंदर्याने नटलेले असून कोकणामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे झुडपे पाहायला मिळतात. तसेच कोकणात औषधी वनस...
01/12/2023

कोकण हे निसर्गसौंदर्याने नटलेले असून कोकणामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे झुडपे पाहायला मिळतात. तसेच कोकणात औषधी वनस्पती सुद्धा आहेत, जेकी विविध आजारांवर गुणकारी असतात. अश्याच काही औषधी वनस्पतींची माहिती आणि त्यांचे गुणकारी रहस्य जाणून घेण्यासाठी जरुर या "प्राचीन कोकण"...

प्राचीन कोकण नेहमीच आपल्या बरोबर नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन येत असतो त्याच अंतर्गत कोकणातील सांस्कृतिक वैभवाचे दर्शन आपल्य...
27/11/2023

प्राचीन कोकण नेहमीच आपल्या बरोबर नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन येत असतो त्याच अंतर्गत कोकणातील सांस्कृतिक वैभवाचे दर्शन आपल्याला घडवत असताना आम्ही आपल्या साठी एक उपहारगृह देखील तयार करुन घेतलेले असून, तिथे आपल्याला कोकणातील पारंपारिक पदार्थांचा देखील आस्वाद घेता येईल. त्यासाठी जरुर या "प्राचीन कोकण"...

#ड्रिंक #सोलकढी

प्राचीन कोकण संग्रहालय नेहमीच आपल्या बरोबर काही नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन येत असतो, त्या अंतर्गत आम्ही आपल्यासाठी तयार के...
26/11/2023

प्राचीन कोकण संग्रहालय नेहमीच आपल्या बरोबर काही नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन येत असतो, त्या अंतर्गत आम्ही आपल्यासाठी तयार केली आहे ३.५ एकर चा परिसरात एक "नक्षत्र बाग".

नक्षत्रांची शास्त्रीय यादी प्रथम वेदांगज्योतिषात आढळते, हा मजकूर ख्रिस्तपूर्व शेवटच्या शतकातील आहे. असे म्हटले जाते की पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य या २७ नक्षत्रांपैकी एक आहे आणि २७ आराध्य वृक्ष निश्चित केले आहेत. २७ नक्षत्र वृक्षांच्या संपूर्ण संचाची उपस्थिती थेट निरोगी आणि निरोगी शारीरिक, मानसिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्राणी तयार करते.या बागेत आपल्या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात सांगितलेल्या २७ नक्षत्रांनुसार झाडे लावली आहेत.

नक्षत्र बाग बघण्यासाठी आणि त्या बद्दल अधिक माहिती व त्याचे औषधीय फायदे जाणून घेण्यासाठी जरुर या "प्राचीन कोकण".

प्राचीन कोकण नेहमीच आपल्या बरोबर नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन येत असतो त्याच अंतर्गत कोकणातील सांस्कृतिक वैभवाचे दर्शन आपल्य...
26/11/2023

प्राचीन कोकण नेहमीच आपल्या बरोबर नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन येत असतो त्याच अंतर्गत कोकणातील सांस्कृतिक वैभवाचे दर्शन आपल्याला घडवत असताना आम्ही आपल्या साठी एक उपहारगृह देखील तयार करुन घेतलेले असून, तिथे आपल्याला कोकणातील पारंपारिक पदार्थांचा देखील आस्वाद घेता येईल. त्यासाठी जरुर या "प्राचीन कोकण"...

कोकणातील संस्कृती व समाज रचने सह तेथील जैवविविधता आणि पक्षी वैभव आपल्या डोळ्याने टिपण्यासाठी व त्या बद्दल अधिक माहिती आण...
26/11/2023

कोकणातील संस्कृती व समाज रचने सह तेथील जैवविविधता आणि पक्षी वैभव आपल्या डोळ्याने टिपण्यासाठी व त्या बद्दल अधिक माहिती आणि तथ्य जाणून घेण्यासाठी जरुर या "प्राचीन कोकण".

Address

Ganpati-pule
Ratnagiri
415615

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919637588565

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prachin Konkan Museum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to Prachin Konkan Museum:

Share

Category