Krishi Vigyan Kendra Baramati

Krishi Vigyan Kendra Baramati Agricultural Service Center,
Farm Science Center

 #गारपिट
07/06/2026

#गारपिट

बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दिनांक 31 मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसासानाची पाहणी अॅग...
06/06/2026

बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दिनांक 31 मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसासानाची पाहणी अॅग्रीकल्चरल डेव्ह्लपमेंट ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. राजेंद्र दादा पवार यांनी केली तसेच झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, होळ, सदोबाची वाडी, सस्तेवाडी इत्यादी गावांमध्ये केळी, डाळिंब, पेरू, वांगी, आंबा, कोथिंबीर, ऊस व चारा पिके यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्या संदर्भाने आज मा. श्री. राजेंद्र दादा पवार व केव्हीके बारामती चे तज्ञ यांनी सदर गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

वडगाव निंबाळकर येथील प्रगतिशील शेतकरी श्री. अभिषेक अनिल कुमार शहा यांची केळी,पेरूची बाग, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. त्याबाबत झालेल्या नुकसानाची माहिती श्री. शहा यांनी दिली.

सदोबाची वाडी येथील श्री. ऋषिकेश धुमाळ यांचे सव्वा एकर वरील अगोरा वांगी यांचे पूर्ण पाने, फुले, फळे गळून गेली होती. सदर प्लॉटची पाहणी करून ते पीक परत आणण्यासाठी तज्ञानंचे सल्ल्याने प्रयत्न करीत असल्याचे श्री. धुमाळ यांनी सांगितले.

सस्तेवाडी येथील श्री. नितीन कदम यांचे एक एकरावरील ढोबळी मिरचीचे शेडनेट गारा व जोराच्या वाऱ्याने संपूर्णपणे कोलमडले होते व पिकांचे नुकसान झाले होते. याच गावातील किशोर कदम यांची अर्ध्या एकर वरील काकडी आणि एक एकरवरील कोथिंबीर याचे देखील पूर्ण नुकसान झाले आहे. त्याबाबत त्यांनी माहिती घेऊन श्री. कदम यांचेशी चर्चा केली. तसेच श्री. कदम यांनी गारपीटीचे मोबाईल मधील फोटो दाखवले.

अश्या प्रकारच्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार रहावे. सरकार कडून काही प्रमाणात मदत मिळेल परंतु आपले नुकसान कमी करण्यासाठी शेतकर्यांनी देखील आपल्या पिकांचा विमा काढून घ्यावा. त्या प्रमाणे अश्या परिस्थितीत तग धरू शकतील अशी पिके करण्यावरती भर द्यावा असे आवाहन श्री. राजेंद्र दादा पवार यांनी केले.

#गारपिट

अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषि विज्ञान केंद्र, बारामती, महाराष्ट्र शासन कृषि विभाग तथा कृषी तंत्रज्ञान व्य...
05/06/2026

अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषि विज्ञान केंद्र, बारामती, महाराष्ट्र शासन कृषि विभाग तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ जून २०२६ रोजी "संतुलित खत व्यवस्थापन, शेती बचाव मोहीम व एल निनो संदर्भात करावयाच्या उपाययोजना हा कार्यक्रम मौजे. शहा ता. इंदापूर येथे पार पडला. या कार्यक्रमांमध्ये कृषी विज्ञान केंद्राचे श्री. यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ - उद्यान विद्या यांनी संतुलित खत वापर व एल निनो त्याचे शेतीवर होणारे परिणाम व करावयाच्या उपायोजना आणि डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच श्री. दीपक गरगडे, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर यांनी कृषी विभागाच्या योजनेविषयी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील 95 शेतकरी उपस्थित होते.


05/06/2026

बदलत्या हवामानानुसार खरीप पिकांचे नियोजन या विषयी Krishi Vigyan Kendra Baramati चे विषय विशेषज्ञ श्री. संतोष करंजे यांनी केलेले मार्गदर्शन ...

संतुलित खत वापर व खेती बचाव मोहीम अंतर्गत इंदापूर  तालुक्यात शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न -ॲग्रीकल्चरल डे...
05/06/2026

संतुलित खत वापर व खेती बचाव मोहीम अंतर्गत इंदापूर तालुक्यात शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न -

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ जून २०२६ रोजी संतुलित खत वापर व खेती बचाव मोहीम अंतर्गत सणसर , ता. इंदापूर येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. धीरज शिंदे यांनी एल निनो – ला निनो परिणाम, हवामान बदल तसेच बदलत्या वातावरणाचा शेती उत्पादनावर होणारा प्रभाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच विषय विशेषज्ञ श्री. संतोष गोडसे यांनी शेतकऱ्यांना संतुलित खतांचा योग्य व कार्यक्षम वापर, भात व सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

संतुलित खत वापर व खेती बचाव मोहीम अंतर्गत भोर तालुक्यात शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न -ॲग्रीकल्चरल डेव्हलप...
05/06/2026

संतुलित खत वापर व खेती बचाव मोहीम अंतर्गत भोर तालुक्यात शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न -

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ जून २०२६ रोजी संतुलित खत वापर व खेती बचाव मोहीम अंतर्गत केंजळ व येवली, ता. भोर येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील विषय विशेषज्ञ श्री. संतोष करंजे यांनी शेतकऱ्यांना संतुलित खतांचा योग्य व कार्यक्षम वापर, भात व सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, एल निनो – ला निनो परिणाम, हवामान बदल तसेच बदलत्या वातावरणाचा शेती उत्पादनावर होणारा प्रभाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच, श्री. अमोल भोसले, प्रगतिशील नैसर्गिक शेतकरी यांनी नैसर्गिक निविष्ठा निर्मिती व वापर याविषयी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना कमी खर्चात शाश्वत शेती करण्याचे महत्त्व पटवून दिले.

श्री. अल्पेश वाघ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापन करण्याचे आवाहन करत शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमास श्री. एस. जाधव (उपविभागीय कृषी अधिकारी), श्री. शरद धर्माधिकारी (तालुका कृषी अधिकारी, भोर), श्री. प्रशांत सरडे व श्री. विजय शिशुपाल (मंडल कृषी अधिकारी), श्री. लक्ष्मीकांत कणसे (आत्मा, भोर) तसेच परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी विविध कृषी विषयांवर चर्चा करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. बदलत्या हवामान परिस्थितीत उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन, नैसर्गिक शेती तंत्रज्ञान व आधुनिक कृषी पद्धतींचा अवलंब करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

04/06/2026
Click below link & Follow KVK Baramati WhatsApp Channel -https://whatsapp.com/channel/0029VadHrAPICVfoqECvm23x
04/06/2026

Click below link & Follow KVK Baramati WhatsApp Channel -

https://whatsapp.com/channel/0029VadHrAPICVfoqECvm23x

Follow KVK Baramati's WhatsApp channel. Krishi Vigyan Kendra Baramati is a district level Farm Science Center established on 1st August 1992 by the Indian Council of Agricultural Research (ICAR), New Delhi at Agricultural Development Trust Baramati, District Pune. KVK Baramati is model Hi-tech, National & International Award winning KVK working for farming community since 32 years for the development of sustainable agriculture.. Join 74 followers for the latest updates.

04/06/2026

Address

At Post: Malegaon Khurd, Near Shardanagar Tal. Baramati Dist. Pune
Baramati
413115

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishi Vigyan Kendra Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to Krishi Vigyan Kendra Baramati:

Share