कलांगण संगमेश्वर

कलांगण संगमेश्वर Kalangan Sangameshwar is an organisation working in cultural field in and around Sangameshwar

21/12/2025

विश्वाचा विश्राम रे | अभेद शौनक अभिषेकी

श्री कर्णेश्वर महोत्सव २०२५ (वर्ष चौथे)

दिवस तिसरा - अभेद शौनक अभिषेकी यांची गायन मैफल

संवादिनी - वरद सोहनी
तबला - प्रशांत पांडव
पखवाज - प्रथमेश तारळकर

20/12/2025

मन लोभले मन मोहने | अभेद शौनक अभिषेकी

श्री कर्णेश्वर महोत्सव २०२५ (वर्ष चौथे)

दिवस तिसरा - अभेद शौनक अभिषेकी यांची गायन मैफल

18/12/2025

माझे जीवन गाणे | अभेद शौनक अभिषेकी

श्री कर्णेश्वर महोत्सव २०२५ (वर्ष चौथे)

दिवस तिसरा - अभेद शौनक अभिषेकी यांची गायन मैफल

संवादिनी - वरद सोहनी
तबला - प्रशांत पांडव
पखवाज - प्रथमेश तारळकर

14/12/2025

प्रथमेश तारळकर | पखवाज

श्री कर्णेश्वर महोत्सव २०२५ (वर्ष चौथे)
दिवस दुसरा - प्रथमेश तारळकर यांचे पखवाज एकल वादन

#कर्णेश्वरमहोत्सव

नमस्कार,आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि श्री कर्णेश्वराच्या कृपाप्रसादाने चौथ्या श्री कर्णेश्वर कला संगीत महोत्सवाची दि...
13/12/2025

नमस्कार,

आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि श्री कर्णेश्वराच्या कृपाप्रसादाने चौथ्या श्री कर्णेश्वर कला संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली. थंडीचा कडाका वाढला असताना सुद्धा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा 'नृत्यद्वैत' या कथ्थक आणि भरतनाट्यम यांच्या आविष्काराने शिवसेवा रुजु झाली. गणेश वंदना, शिववंदना आणि पुष्पांजली यांनी नृत्य सेवा रंगतदार झाली आणि श्री कर्णेश्वराच्या चरणी चौथ्या कला संगीत महोत्सवाचा पहिला दिवस कृतार्थ झाला.

#कर्णेश्वरमहोत्सव

श्री कर्णेश्वर महोत्सव २०२५दिवस पहिला - नृत्यद्वैत सादरकर्त्या - श्रुती आठल्ये, प्रणाली तोडणकर आणि सहकारीसर्वांनी नक्की ...
12/12/2025

श्री कर्णेश्वर महोत्सव २०२५

दिवस पहिला - नृत्यद्वैत

सादरकर्त्या - श्रुती आठल्ये, प्रणाली तोडणकर आणि सहकारी

सर्वांनी नक्की या..

#कर्णेश्वरमहोत्सव

रसिकहो नमस्कार !

कथ्थक आणि भरतनाट्यम हे दोन्ही शास्त्रीय नृत्य प्रकार भारतीय संस्कृती आणि अध्यात्मातून उगम पावले आहेत. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित हे दोन्ही नृत्य प्रकार स्वतःची शैली, तंत्रे आणि अभिव्यक्ती राखून आहेत. भरतनाट्यम हा दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार तर कथ्थक हा उत्तर भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. ही दोन्ही नृत्ये हा भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. या दोन्ही नृत्य प्रकारात काही मूलभूत फरक आणि काही साम्य स्थळे आहेत. गेली तीन वर्षे कथ्थक नृत्य सादरीकरणाने श्री कर्णेश्वराची व रसिकांची सेवा केल्यावर यावर्षी या दोन्ही नृत्य प्रकारांचे एकत्रित सादरीकरण करून यावर्षीच्या कर्णेश्वर महोत्सवाची सुरुवात करत आहोत. विजयादशमीच्या मुहूर्तावर यावर्षीच्या कर्णेश्वर महोत्सवाच्या तारखांची घोषणा आपण केली होती. आज दीपावली पाडव्यानिमित्त या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या "नृत्यद्वैत" या कार्यक्रमाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आपली उपस्थिती आणि आशीर्वाद प्रार्थनीय आहेच.

दीपावली शुभचिंतन!

20/11/2025

कथ्थक नृत्यालंकार सोनिया परचुरे यांनी श्री कर्णेश्वर महोत्सव २०२५ साठी केलेलं आवाहन

#कर्णेश्वरमहोत्सव

14/11/2025

शब्दा वाचून कळले सारे | सोनिया परचुरे | कथ्थक

श्री कर्णेश्वर महोत्सव २०२४ (वर्ष तिसरे)
दिवस दुसरा - नृत्यालंकार सोनिया परचुरे यांचे एकल कथ्थक नृत्य

रसिकहो नमस्कार!     सन १९९५ मध्ये चिपळूण येथे झालेल्या ७६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील अध्यक्षीय  भाषणात "मी ...
27/10/2025

रसिकहो नमस्कार!

सन १९९५ मध्ये चिपळूण येथे झालेल्या ७६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात "मी शब्द-सुरांचा पुजारी आहे... नव्हे अभिषेकी आहे! साहित्य संगीत आणि नाटक या तिन्ही क्षेत्रांवर माझं प्रेम आहे, मात्र मी रंगतो सुरांतच!... तेच माझे जीवनगाणे आहे!" असे उद्गार काढणाऱ्या गोमंतकातील मंगेशी देवस्थानातील सांबसदाशिवांवर अभिषेक करणाऱ्या घराण्यातील पंडित जितेंद्र अभिषेकी आणि "गायनाचा वारसा केवळ सुरांचा प्रवास नाही तर तो भावभावनांचा, साधनेचा आणि संस्कृतीचा वारसा आहे असं मानणारे आणि हा संगीत वारसा पुढे नेणारे शौनक अभिषेकी! पणजोबा, आजोबा, वडील यांच्याकडून चालत आलेला समृद्ध वारसा पुढे नेणारा आश्वासक आणि युवा गायक *अभेद शौनक अभिषेकी!* भगवान कर्णेश्वरांवर स्वरांचा अभिषेक करणारा यावर्षीच्या कर्णेश्वर महोत्सवाच्या सांगतेचा आणि तिसऱ्या दिवशीचा "स्वराभिषेक"

रसिकहो नमस्कार!सन १९९५ मध्ये चिपळूण येथे झालेल्या ७६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील अध्यक्षीय  भाषणात "मी शब्द-...
27/10/2025

रसिकहो नमस्कार!

सन १९९५ मध्ये चिपळूण येथे झालेल्या ७६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात "मी शब्द-सुरांचा पुजारी आहे... नव्हे अभिषेकी आहे! साहित्य संगीत आणि नाटक या तिन्ही क्षेत्रांवर माझं प्रेम आहे, मात्र मी रंगतो सुरांतच!... तेच माझे जीवनगाणे आहे!" असे उद्गार काढणाऱ्या गोमंतकातील मंगेशी देवस्थानातील सांबसदाशिवांवर अभिषेक करणाऱ्या घराण्यातील पंडित जितेंद्र अभिषेकी आणि "गायनाचा वारसा केवळ सुरांचा प्रवास नाही तर तो भावभावनांचा, साधनेचा आणि संस्कृतीचा वारसा आहे असं मानणारे आणि हा संगीत वारसा पुढे नेणारे शौनक अभिषेकी!" पणजोबा, आजोबा, वडील यांच्याकडून चालत आलेला समृद्ध वारसा पुढे नेणारा आश्वासक आणि युवा गायक अभेद शौनक अभिषेकी! भगवान कर्णेश्वरांवर स्वरांचा अभिषेक करणारा यावर्षीच्या कर्णेश्वर महोत्सवाच्या सांगतेचा आणि तिसऱ्या दिवशीचा "स्वराभिषेक".

रसिकहो नमस्कार!      श्री गणेशाने शंकरांचा क्रोधाग्नी शांत करण्यासाठी सर्वात प्रथम पखवाज वादन केलं होतं. बनारसचे प्रख्या...
27/10/2025

रसिकहो नमस्कार!

श्री गणेशाने शंकरांचा क्रोधाग्नी शांत करण्यासाठी सर्वात प्रथम पखवाज वादन केलं होतं. बनारसचे प्रख्यात तबला महर्षी पंडित किशन महाराज यांनी स्वतः पखवाज वादन करणाऱ्या गणेशाची महाकाय परंतु सुरेख मूर्ती घडवली होती आणि ते अत्यंत सुंदर " गणेशपरण" वाजवत असत. शिवशंकरांच्या तांडव नृत्यात कधी विष्णूने, ब्रह्म्याने तर कधी नंदिने पखवाज वाजवत ताल दिला. पंडित पागल दास यांच्या मते पखवाज हे वाद्य प्राचीन असून मृदंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाद्याचा तो उत्कट अविष्कार आहे म्हणूनच पखवाज वादकांना पखवाजाचार्य न म्हणता मृदंगाचार्य म्हणूनच संबोधले जाते. हिंदुस्तानी संगीतातील धृपद गायन पद्धतीत, शास्त्रीय नृत्यात, पुष्टीमार्गीय हवेली संगीत आणि वारकरी भजनात पखवाज अनिवार्य आहे. रामचरितमानस या ग्रंथात "ताल मृदंग अनुपा तथा घंटा घंटी पखवाज आउज," ताल पखवाज, बिना"असे पखवाज विषयक उल्लेख सापडतात. शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी "पखवाज हे वाजवण्यासाठी खडतर वाद्य!" हे काढलेले उद्गार यथार्थ आहेतच तरीही साधनेने लाभणारा या वादनाचा आनंद काही औरच! संत सोयराबाई यांनी याचे वर्णन एका अभंगात केलं आहे.“झांज मृदंग पखवाज वाजती,
हरिनाम गातात नाचती मंडळी "

श्री कर्णेश्वर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आस्वाद घेऊया "मृदंग नाद"या कार्यक्रमातून.... नक्की या ... स्वागत आहे!

रसिकहो नमस्कार !                          कथ्थक आणि भरतनाट्यम हे दोन्ही शास्त्रीय नृत्य प्रकार भारतीय संस्कृती आणि अध्या...
27/10/2025

रसिकहो नमस्कार !

कथ्थक आणि भरतनाट्यम हे दोन्ही शास्त्रीय नृत्य प्रकार भारतीय संस्कृती आणि अध्यात्मातून उगम पावले आहेत. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित हे दोन्ही नृत्य प्रकार स्वतःची शैली, तंत्रे आणि अभिव्यक्ती राखून आहेत. भरतनाट्यम हा दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार तर कथ्थक हा उत्तर भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. ही दोन्ही नृत्ये हा भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. या दोन्ही नृत्य प्रकारात काही मूलभूत फरक आणि काही साम्य स्थळे आहेत. गेली तीन वर्षे कथ्थक नृत्य सादरीकरणाने श्री कर्णेश्वराची व रसिकांची सेवा केल्यावर यावर्षी या दोन्ही नृत्य प्रकारांचे एकत्रित सादरीकरण करून यावर्षीच्या कर्णेश्वर महोत्सवाची सुरुवात करत आहोत. आपली उपस्थिती आणि आशीर्वाद प्रार्थनीय आहेच.

#कर्णेश्वर_महोत्सव #कसबा #कलांगण #संगमेश्वर

Address

Ratnagiri
415611

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कलांगण संगमेश्वर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to कलांगण संगमेश्वर:

Share