Art Circle, Ratnagiri

Art Circle, Ratnagiri Art Circle, Ratnagiri is an organization working in cultural field in and around Ratnagiri. Established in 2008.

‘शाम-ए-गझल'मैफलीने रसिक मंत्रमुग्ध; गौतमी वाडकर ठरली गझल गायन स्पर्धेची विजेतीरत्नागिरी:शब्दांची नजाकत आणि स्वरांचा लहेज...
27/04/2026

‘शाम-ए-गझल'मैफलीने रसिक मंत्रमुग्ध; गौतमी वाडकर ठरली गझल गायन स्पर्धेची विजेती

रत्नागिरी:

शब्दांची नजाकत आणि स्वरांचा लहेजा यांचा सुरेख संगम असलेल्या 'शाम-ए-गझल' या कार्यक्रमाने नुकतीच रत्नागिरीकरांची मने जिंकली. कला क्षेत्रातील प्रतिष्ठित 'आर्ट सर्कल फाउंडेशन'च्या वतीने कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष होते. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरी आणि सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे यांची सुश्राव्य मैफिल अनुभवायला मिळाली.

*चुरशीची स्पर्धा आणि निकाल*
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या चुरशीच्या स्पर्धेत स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस गझला सादर करून परीक्षकांची दाद मिळवली. या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे:
• प्रथम क्रमांक: गौतमी वाडकर (संगमेश्वर)
• द्वितीय क्रमांक: लीना खामकर (रत्नागिरी)
• तृतीय क्रमांक: प्रतीक्षा कोयंडे (कणकवली)
विजेत्यांना स्वराधिराज श्री. राजाभाऊ शेंबेकर आणि मुख्य परीक्षक दत्तप्रसाद रानडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

*दत्तप्रसाद रानडे यांची स्वरमैफिल व मार्गदर्शन*

दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध गझल गायक व संगीतकार दत्तप्रसाद रानडे यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. 'चुपके चुपके', 'काश ऐसा कोई मंजर होता' आणि 'एक होकार दे' यांसारख्या प्रसिद्ध गझला सादर करत त्यांनी मैफलीत रंग भरला.
यावेळी स्पर्धकांशी संवाद साधताना रानडे म्हणाले, "गझल सादर करताना आपण कविताच सादर करत आहोत, ही भावना महत्त्वाची आहे. सतत हरकती घेऊन गाणे म्हणजे गझल नव्हे, तर शब्दांच्या आशयावर आणि उच्चारांवर भर दिला पाहिजे."

या स्पर्धेला निखिल रानडे व प्रथमेश शहाणे (तबला) आणि चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम) यांनी पूरक साथसंगत केली. दत्तप्रसाद रानडे यांच्या मैफलीत हेरंब जोगळेकर (तबला) आणि उदय गोखले (व्हायोलिन) यांच्या वादनाने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. ध्वनिसंयोजनाची जबाबदारी एस. कुमार साऊंडच्या उदयराज सावंत यांनी नेहेमीप्रमाणे समर्थपणे पेलली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन कानविंदे यांनी केले. गझल प्रेमी आणि साहित्याची ओढ असणाऱ्या रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा 'स्मृती सोहळा' अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

कै. नलिनी प्रताप कानविंदे स्मृती गझल गायन स्पर्धा
26/04/2026

कै. नलिनी प्रताप कानविंदे स्मृती गझल गायन स्पर्धा

उद्या दुपारी ३ पासून.. चुकवू नये असा अप्रतिम कार्यक्रम.. जरूर या ✨
25/04/2026

उद्या दुपारी ३ पासून.. चुकवू नये असा अप्रतिम कार्यक्रम.. जरूर या ✨

येत्या रविवारी दुपारी ३ पासून..नक्की या ✨
22/04/2026

येत्या रविवारी दुपारी ३ पासून..नक्की या ✨

आपला सहभाग नोंदवला का ? शेवटचे ३ दिवस बाकी..
31/03/2026

आपला सहभाग नोंदवला का ? शेवटचे ३ दिवस बाकी..

*आर्ट सर्कलच्या वतीने गझल गायन स्पर्धेचे आयोजन**सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे करणार परीक्षण*आर्ट सर्कल रत्नागिरी ...
22/03/2026

*आर्ट सर्कलच्या वतीने गझल गायन स्पर्धेचे आयोजन*
*सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे करणार परीक्षण*

आर्ट सर्कल रत्नागिरी तर्फे यांच्या वतीने कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गझल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ ते ४० वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली असून मराठी, हिंदी किंवा उर्दू भाषेतील गझल स्वीकारली जाणार आहे.

स्पर्धकांनी आपली गझल ध्वनिमुद्रित करून नाव, वय व राहण्याचे ठिकाण नमूद करत *२ एप्रिल २०२६ पर्यंत* व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 8669 082 727 वर पाठवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कराओके किंवा लाईव्ह कार्यक्रमातील रेकॉर्डिंग स्वीकारले जाणार नाही. तानपूरा, हार्मोनियम व तबला या वाद्यांच्या साथीनेच ध्वनिमुद्रण अपेक्षित आहे.

प्राथमिक फेरीतून निवडलेल्या १० स्पर्धकांची यादी ९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल. *अंतिम फेरी २६ एप्रिल रोजी रत्नागिरी* येथे होणार आहे.

या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझल गायक श्री. दत्तप्रसाद रानडे करणार आहेत.

स्पर्धेत प्रथम ₹१०,०००, द्वितीय ₹७,००० व तृतीय ₹५,००० अशी पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आर्ट सर्कलच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक 7 आणि 8 फेब्रुवारी दोन दर्जेदार नाट्यकृती. चुकवू नका. सभासदांसाठी विनामूल्य, इतर सर्वांना देणगी मूल्य प्रवेशिका उ...
05/02/2026

दिनांक 7 आणि 8 फेब्रुवारी दोन दर्जेदार नाट्यकृती. चुकवू नका.
सभासदांसाठी विनामूल्य, इतर सर्वांना देणगी मूल्य प्रवेशिका उपलब्ध.
#मराठीनाटक
#समांतरंगभूमी

18/01/2026

25 जानेवारी रोजी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ होणार आहे वहाणे भगिनींच्या वाद्यसंगीताने! संगीततज्ञ डॉ. लोकेश वहाणे यांच्या संस्कृती आणि प्रकृती या दोन कन्यांनी लहान वयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. एकीने उस्ताद शहीद परवेझ यांच्या मार्गदर्शनाखाली सतार वादनात प्राविण्य मिळवले तर प्रकृती यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली संतूर वादनात आपले कौशल्य वृद्धिंगत केले. त्यांच्या या अवीट सुरेल सहवादनाला तबला साथ करत आहेत यशवंत वैष्णव. अधिक माहितीसाठी संपर्क करा: 866828668272828

गेली १८ वर्षे आर्ट सर्कल रत्नागिरीमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे. शास्त्रीय संगीत महोत्सव, नाट्य महोत्सव, कला जत...
01/01/2026

गेली १८ वर्षे आर्ट सर्कल रत्नागिरीमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे. शास्त्रीय संगीत महोत्सव, नाट्य महोत्सव, कला जत्रा, स्वरभास्कर बैठक, विविध दर्जेदार स्पर्धा, विविध उपयुक्त आणि मार्गदर्शनपर कार्यशाळा अशा अनेक आघाड्यांवर संस्था प्राणपणाने काम करत आहे.

संस्थेच्या जन्माच्या वर्षी वार्षिक सभासदत्व ही योजना आम्ही सुरू केली. उद्देश दोन... पहिला म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच पैसे जमावेत म्हणजे वर्षभर उत्तमोत्तम कार्यक्रमांसाठी त्याचा विनियोग कसा करायचा याचे नियोजन करता यावे आणि दुसरा म्हणजे प्रेक्षकांच्या संख्येचा अंदाज यावा!

गेली 18 वर्ष हे संस्थेतर्फे आम्ही अतिशय यशस्वीपणे राबवत आहोत. आणि या यशाचं सगळं श्रेय, जे रसिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या कष्टाच्या पैशातून मोलाचा वाटा संस्थेच्या हातात देतात, त्या रसिकांचं आहे. आपल्या घामाचा पैसा अत्यंत विश्वासाने रसिक मंडळी संस्थेला देतात, ही संस्थेसाठी खूप मोठी जबाबदारी आहे. एखाद्या वर्षी असंही झालं आहे की खूप सारे कार्यक्रम करता येणं शक्य झालं नाही, पण पुढच्याही वर्षी तितक्याच निरलसपणे आणि विनातक्रार ही मंडळी पैसे देत राहिली आहेत. कोरोनाच्या काळात याच पाठिंब्यामुळे आपला संगीत महोत्सव होऊ शकला.

येत्या वर्षापासून आर्ट सर्कलचा हा रसिकांचा आणि दात्यांचा परीघ आम्ही वाढवू इच्छितो. कारण आता फक्त कार्यक्रमांचं आयोजन इतक्याच मर्यादेत न राहता, संस्थेकडून कार्यशाळादेखील आयोजित करण्यात येणार आहेत. नाट्यशिबीर, आवाजाचा वापर, चित्रकला, फोटोग्राफी, गायन, वादन असे विविध क्षेत्रामधील प्रशिक्षक कलाकार आमंत्रित करून त्यांचं मार्गदर्शन आपल्या मुलांना, कलाकारांना मिळावं हा हेतू ठेवून अशा कार्यशाळा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.

या सर्व कारणास्तव सभासदांची संख्या वाढवणे आम्हाला आवश्यक वाटते. कारण संस्थेच्या प्रत्येक कामात सभासदांना आपलेपणा वाटत राहतो. आपल्या देणगीला 80G certificate देखील लागू आहे. तरी, आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्यासह आपल्या मित्रमंडळींनादेखील या परिघात सामावून घ्या.

सर्व सभासदांना प्रत्येकी एक कार्ड देण्यात येते. आर्ट सर्कलच्या बॅनर खाली होणारे सर्व कार्यक्रम या कार्ड वर पाहता येतात. दरवर्षी या कार्डचे नूतनीकरण करता येतं. हे कार्ड हस्तांतरितही करता येतं. कार्डाच्या प्रकारानुसार आसनव्यवस्था असते.

सभासदत्व तपशील पुढीलप्रमाणे:

आश्रयदाते कार्ड: रू. 3600 प्रती व्यक्ती
डायमंड कार्ड: रू. 2400प्रती व्यक्ती
गोल्ड कार्ड: रू. 1200प्रती व्यक्ती.

याव्यतिरिक्त, आपण आर्ट सर्कल संस्थेला देणगी रक्कमदेखील देऊ शकता. कार्यक्रमांना प्रायोजकत्वदेखील देऊ शकता. यासाठी UPI ID: 9850980442@sbi

याबाबत अधिक माहिती मिळवण्याकरिता कृपया [email protected] किंवा 8669082727 वर संपर्क साधावा, ही विनंती. धन्यवाद!

Address

3212, M. G. Road
Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Art Circle, Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to Art Circle, Ratnagiri:

Share

Category